जिल्ह्यात १७ जणांना कोरोना; २० जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:26 AM2020-12-29T04:26:28+5:302020-12-29T04:26:28+5:30

सांगली : जिल्ह्यातील काेरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी १७ ने वाढ झाली. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांचेही प्रमाण समाधानकारक ...

Corona to 17 in the district; 20 corona free | जिल्ह्यात १७ जणांना कोरोना; २० जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात १७ जणांना कोरोना; २० जण कोरोनामुक्त

Next

सांगली : जिल्ह्यातील काेरोनाबाधितांच्या संख्येत रविवारी १७ ने वाढ झाली. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांचेही प्रमाण समाधानकारक आहे. दिवसभरात २० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील बाधितांची संख्या कमी होत असून बरे होणाऱ्यांचेही प्रमाण अधिक आहे. रविवारी जिल्ह्यातील खानापूर, मिरज, शिराळा, पलूस आणि तासगाव तालुक्यासह मिरज शहरात एकाही नव्या रुग्णाची नोंद झालेली नाही.

आरोग्य विभागाच्यावतीने आरटीपीसीआर अंतर्गत ३८८ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली त्यात १२ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ६९४ चाचण्यांमधून ९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

गेल्या पाच दिवसांपासून शनिवार वगळता मृत्यूचे प्रमाण शून्य आहे. तर सांगली शहरात केवळ दोन नवीन रुग्ण आढळले आहेत.

उपचार घेत असलेल्या १८९ रूग्णांपैकी ४१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे यातील ३३ जण ऑक्सिजनवर तर ८ जण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत. सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येकी दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ४७५०५

उपचार घेत असलेले १८९

कोरोनामुक्त झालेले ४५५८८

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७२८

रविवारी दिवसभरात

सांगली २

आटपाडी ६

जत, कवठेमहांकाळ प्रत्येकी ३

कडेगाव २

वाळवा १

Web Title: Corona to 17 in the district; 20 corona free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.