जिल्ह्यात १८ जणांना कोरोना; २२ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:06 AM2021-01-13T05:06:34+5:302021-01-13T05:06:34+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत रविवारी १८ रुग्णांची भर पडली. दिवसभरात २२ जण कोरोनामुक्त झाले असून, गेल्या सहा ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत रविवारी १८ रुग्णांची भर पडली. दिवसभरात २२ जण कोरोनामुक्त झाले असून, गेल्या सहा दिवसांपासून कोराेनाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येतील चढ-उतार कायम आहे. तरीही बाधितांची संख्या मर्यादीत असल्याने दिलासा मिळत आहे. रविवारी १८ नवीन रुग्णांचे निदान झाले असताना शिराळा, पलूस तालुक्यात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.
रविवारी आरोग्य यंत्रणेच्यावतीने आरटीपीसीआरअंतर्गत ३१० जणांच्या नमुन्यांची चाचणी घेतली. त्यात १४ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ४०० नमुन्यांच्या चाचणीमधून ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
जिल्ह्यातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २०३ रुग्णांपैकी ४६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ४० जण ऑक्सिजनवर, तर ६ जण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७७८९
उपचार घेत असलेले २०३
कोरोनामुक्त झालेले ४५८५१
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७३५
रविवारी दिवसभरात
सांगली १
मिरज ४
जत ४
खानापूर ३
आटपाडी २
कडेगाव, कवठेमहांकाळ, मिरज, वाळवा प्रत्येकी १