जिल्ह्यात १९ जणांना कोरोना; १६ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:27 AM2021-01-03T04:27:17+5:302021-01-03T04:27:17+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी १९ ने वाढ झाली. वर्षाच्या प्रारंभी दिलासादायक आकडेवारी कायम राहताना १६ जण कोराेनामुक्त ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी १९ ने वाढ झाली. वर्षाच्या प्रारंभी दिलासादायक आकडेवारी कायम राहताना १६ जण कोराेनामुक्त झाले आहेत. दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी मर्यादित राहिली असतानाच बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढत चालले आहे. मृत्यूचे प्रमाणही कमी होताना या आठवड्यात पाचव्यावेळी एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मिरज, तासगाव, वाळवा आणि कवठेमहांकाळ तालुक्यात एकाही बाधिताची नोंद झाली नाही.
आरोग्य यंत्रणेच्यावतीने शुक्रवारी आरटीपीसीआरअंतर्गत ५१४ जणांच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. त्यात १९ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ९१० चाचण्यांमधून ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या १९३ रुग्णांपैकी ४१ जण ऑक्सिजनवर, तर ६ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७६१२
उपचार घेत असलेले १९३
काेरोनामुक्त झालेले ४५६८६
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७३३
शुक्रवारी दिवसभरात
सांगली ४
जत, शिराळा, खानापूर, कडेगाव प्रत्येकी ३
आटपाडी २
पलूस १