जिल्ह्यात १९ जणांना कोरोना; ३४ जण कोराेनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:43 AM2020-12-15T04:43:10+5:302020-12-15T04:43:10+5:30
सांगली : जिल्ह्यातील काेरोनाला लागलेला उतार सोमवारीही कायम होता. बाधितांची संख्या १९ इतकी मर्यादीत राहताना दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद ...
सांगली : जिल्ह्यातील काेरोनाला लागलेला उतार सोमवारीही कायम होता. बाधितांची संख्या १९ इतकी मर्यादीत राहताना दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झाली नसल्याने दिलासा मिळाला, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांत एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही.
गेल्या चार महिन्यांतील सर्वात कमी बाधितांची नोंद रविवारी झाली होती, तर सोमवारीही त्यात केवळ २ ने वाढ होत १९ जणांना नव्याने कोराेनाची बाधा झाली. जिल्ह्यातील कडेगाव, कवठेमहांकाळ, पलूस, तासगाव, शिराळा तालुक्यात एकाही नव्या रुग्णाची नोंद झाली नाही.
आरोग्य यंत्रणेच्यावतीने साेमवारी दिवसभरात आरटीपीसीआरअंतर्गत १५९ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात पाचजणांना कोरोनाचे निदान झाले, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १२५५ चाचण्यांमधून १५ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
उपचार घेत असलेल्या ३३७ रुग्णांपैकी ६८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५९ जण ऑक्सिजनवर, तर ९ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७२६८
उपचार घेत असलेले ३३७
कोरोनामुक्त झालेले ४५२०९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७२२
सोमवारी दिवसभरात
सांगली २
मिरज ४
आटपाडी, खानापूर प्रत्येकी ४
जत, वाळवा प्रत्येकी २
मिरज तालुका १