जिल्ह्यात २३ जणांना कोरोना; ३९ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:51 AM2020-12-17T04:51:42+5:302020-12-17T04:51:42+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना, बुधवारी २३ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३९ ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना, बुधवारी २३ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३९ जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर जिल्ह्यातील मिरज आणि खानापूर तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन दिवसांपेक्षा बाधितांच्या संख्येत किंचीत वाढ झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सर्वात नीचांकी रुग्णसंख्या नोंदवली जात आहे. गेल्या पाच महिन्यांंतील सर्वात कमी बाधितांची नोंद झाल्याने जिल्ह्यातील कोरोनास्थिती नियंत्रणात आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी मिरज आणि खानापूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना बळींची संख्या १७२५ वर पोहोचली आहे. महापालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
बुधवारी आरोग्य यंत्रणेच्यावतीने आरटीपीसीआरअंतर्गत ४०६ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात १५ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १३८१ चाचण्यांमधून ९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
उपचार घेत असलेल्या २८९ रुग्णांपैकी ५० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४३ जण ऑक्सिजनवर, तर ७ जण व्हेंटिलेटरवर आहेत. मुंबईतील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७३०३
उपचार घेत असलेले २८९
कोरोनामु्क्त झालेले ४५२८९
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७२५
बुधवारी दिवसभरात...
सांगली ६
आटपाडी, खानापूर प्रत्येकी ४
मिरज, कडेगाव प्रत्येकी २
जत, पलूस, शिराळा, वाळवा प्रत्येकी १