जिल्ह्यात २३१ जणांना कोरोना; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:27 AM2021-03-26T04:27:11+5:302021-03-26T04:27:11+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ चिंता वाढवणारी ठरत आहे. गुरुवारी दिवसभरात २३१ जणांना कोरोनाचे निदान झाले असून, मिरज ...

Corona to 231 people in the district; Death of both | जिल्ह्यात २३१ जणांना कोरोना; दोघांचा मृत्यू

जिल्ह्यात २३१ जणांना कोरोना; दोघांचा मृत्यू

Next

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ चिंता वाढवणारी ठरत आहे. गुरुवारी दिवसभरात २३१ जणांना कोरोनाचे निदान झाले असून, मिरज आणि खानापूर तालुक्यातील दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रासह जत, आटपाडी, खानापूर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालल्याने व उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येतही वाढ होत असल्याने प्रशासनाने सतर्कता बाळगण्यास सुरुवात केली आहे. महापालिका क्षेत्रातील ५९ रुग्ण सापडले आहेत, तर इतरही भागात बाधितांची संख्या वाढतच आहे.

आरोग्य विभागाच्यावतीने आरटीपीसीआरअंतर्गत १३४१ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात १७९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १०१५ जणांच्या तपासणीतून ६१ जणांना कोराेनाचे निदान झाले आहे.

उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असून, सध्या १४३९ जण उपचार घेत आहेत. त्यातील ९३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ८५ जण ऑक्सिजनवर, तर ९ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत आता वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील ६, रत्नागिरी २, तर कोल्हापूर जिल्ह्यातील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.

चाैकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ५०३९३

उपचार घेत असलेले १४३९

कोरोनामुक्त झालेले ४७१७४

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७८०

गुरुवारी दिवसभरात

सांगली ३०

मिरज २९

जत ३४

आटपाडी, मिरज तालुका प्रत्येकी ३०

खानापूर २७

वाळवा २१

कडेगाव, कवठेमहांकाळ प्रत्येकी १०

तासगाव ७

पलूूस २

शिराळा १

Web Title: Corona to 231 people in the district; Death of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.