जिल्ह्यात २३६ जणांना कोरोना; सात जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:33 AM2021-09-09T04:33:31+5:302021-09-09T04:33:31+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत बुधवारी २३६ नवीन रुग्ण आढळले. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत ४०४ जण ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत बुधवारी २३६ नवीन रुग्ण आढळले. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत ४०४ जण कोरोनामुक्त झाले, सात जणांचा मृत्यू झाला. म्युकरमायकोसिसचे नवीन रुग्ण आढळले नाहीत, पण दोघांचे मृत्यू झाले.
जिल्ह्यातील सात जणांचा मृत्यू झाला असून त्यात सांगली १, तासगाव १, कवठेमहांकाळ १, वाळवा ३, खानापूर १ अशा रुग्णांचा मृत्यू झाला.
उपचार घेत असलेल्या २२७० रुग्णांपैकी ५१९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ४२९ जण ऑक्सिजनवर, तर ९० जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य यंत्रणेने आरटीपीसीआरअंतर्गत २०४८ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात १०५ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ५१४७ जणांच्या तपासणीतून १३७ जण पॉझिटिव्ह आढळले. परजिल्ह्यातील सहा रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १९४८४४
उपचार घेत असलेले २२१७
कोरोनामुक्त झालेले १८७५००
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५१२७
बुधवारी दिवसभरात
सांगली १७
मिरज ४
आटपाडी ३०
कडेगाव १२
खानापूर ४५
पलूस १०
तासगाव ४८
जत १४
कवठेमहांकाळ ५
मिरज तालुका ३०
शिराळा ५
वाळवा १६