कोरोनाचे २६ नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:06 AM2021-01-13T05:06:38+5:302021-01-13T05:06:38+5:30

सांगली : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे २६ नवीन रुग्ण आढळले. बाधितांच्या आकडेवारीतील चढउतार कायम असताना सहा दिवसांपासून एकाचाही कोरोनाने मृत्यू ...

Corona 26 new patients; Death of both | कोरोनाचे २६ नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

कोरोनाचे २६ नवे रुग्ण; दोघांचा मृत्यू

Next

सांगली : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे २६ नवीन रुग्ण आढळले. बाधितांच्या आकडेवारीतील चढउतार कायम असताना सहा दिवसांपासून एकाचाही कोरोनाने मृत्यू झाला नव्हता. सोमवारी मात्र, जत तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर १२ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली.

कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असलीतरी संख्या तुलनेने कमी असल्याने दिलासा मिळत आहे. सोमवारी २६ जणांना बाधा झाली तर दोघांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा दिवसांत जिल्ह्यात कोरोनाने एकाचाही मृत्यू झाला नव्हता. मिरज शहरासह पलूस, तासगाव तालुक्यात एकही नवा बाधित आढळून आलेला नाही.

आरोग्य विभागाच्या वतीने सोमवारी घेतलेल्या आरटीपीसीआरअंतर्गत ११५ जणांच्या नमुन्यांच्या तपासणीत ८ जणांना कोरोनाचे निदान झाले तर रॅपिड ॲन्टीजेनच्या ८५६ चाचण्यांमधून १६ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जिल्ह्यातील सहा रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या २१५ रुग्णांपैकी ५७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४६ जण ऑक्सिजनवर तर ११ जण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत. दाखल रुग्णांपैकी गंभीर प्रकृती असलेल्या रुग्णसंख्येत सोमवारी वाढ झाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित- ४७८१५

उपचार घेत असलेले- २१५

कोराेनामुक्त झालेले- ४५८६३

आतापर्यंतचे एकूण मृत्यू- १७३७

सोमवारी दिवसभरात

वाळवा ११

सांगली ५

आटपाडी, कवठेमहांकाळ, शिराळा प्रत्येकी २

जत, कडेगाव, खानापूर, मिरज प्रत्येकी १

Web Title: Corona 26 new patients; Death of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.