दोन दिवसांत २६६५ जणांना कोरोना; १०२ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:22 AM2021-05-03T04:22:00+5:302021-05-03T04:22:00+5:30

आठवड्यापासून जिल्ह्यात सरासरी तेराशेच्यावर रुग्णांना कोरोनाचे निदान होत आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. यात ...

Corona to 2665 people in two days; 102 killed | दोन दिवसांत २६६५ जणांना कोरोना; १०२ जणांचा मृत्यू

दोन दिवसांत २६६५ जणांना कोरोना; १०२ जणांचा मृत्यू

Next

आठवड्यापासून जिल्ह्यात सरासरी तेराशेच्यावर रुग्णांना कोरोनाचे निदान होत आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे. यात वाळवा तालुक्यात सर्वाधिक ९, तर मिरज आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी ७, खानापूर ६, कवठेमहांकाळ ४, पलूस, जत प्रत्येकी ३, तासगाव, शिराळा, आटपाडी प्रत्येकी २, तर कडेगाव तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

शनिवारी ३६ जणांचा मृत्यू झाला. त्यात महापालिका क्षेत्र, वाळवा आणि खानापूर तालुक्यांतील प्रत्येकी ५, जत, तासगाव प्रत्येकी ४, मिरज तालुका ६, कवठेमहांकाळ ३, शिराळा २, तर कडेगाव आणि पलूस तालुक्यांतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

रविवारी आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआर अंतर्गत २३६९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ८४४ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर रॅपिड अँँटिजेनच्या २२०७ जणांच्या तपासणीतून ५४७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १३ हजार ५९५ झाली असून, त्यातील २३३३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील २१०२ जण ऑक्सिजनवर, तर २३१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. रविवारी परजिल्ह्यातील ८ जणांचा मृत्यू झाला असून, दिवसभरात ५३ जण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित ७८३४३

उपचार घेत असलेले १३५९५

कोरोनामुक्त झालेले ६२४००

आतापर्यंतचे एकूण मृत्यू २३४८

रविवारी दिवसभरात

सांगली १६७

मिरज ११९

मिरज तालुका २००

आटपाडी १६८

खानापूर १६२

वाळवा १३८

कवठेमहांकाळ ९५

जत ८७

तासगाव ७१

पलूस ५६

कडेगाव ४३

शिराळा ३२

Web Title: Corona to 2665 people in two days; 102 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.