जिल्ह्यात २८ जणांना कोरोना; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:26 AM2021-03-05T04:26:53+5:302021-03-05T04:26:53+5:30
सांगली : जिल्ह्यात गुरुवारी २८ जणांना कोरोनाचे निदान झाले. तर मिरज शहरातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाधितांच्या संख्येतील किंचित ...
सांगली : जिल्ह्यात गुरुवारी २८ जणांना कोरोनाचे निदान झाले. तर मिरज शहरातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बाधितांच्या संख्येतील किंचित वाढ कायम असल्याने चिंता असली तरी ९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
बुधवारी अडीच महिन्यांतील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाल्यानंतर गुरुवारीही सरासरीपेक्षा जादा रुग्णांची नोंद झाली आहे. महापालिका क्षेत्रात ११ रुग्णांची नोंद झाली आहे.
आराेग्य विभागाच्यावतीने गुरुवारी ६०१ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात २० जणांना कोरोनाचे निदान झाले तर रॅपिड ॲन्टीजेनच्या ७८५ जणांच्या नमुन्यांच्या चाचणीतून ८ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ होत असून सध्या २०५ जण उपचार घेत आहेत. त्यातील ४८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४२ जण ऑक्सिजनवर तर ६ जण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत.