जिल्ह्यात ३८० जणांना कोरोना; पाच जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:28 AM2021-04-08T04:28:11+5:302021-04-08T04:28:11+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या कायम असून बुधवारी पुन्हा एकदा सर्वाधिक संख्येने रुग्ण आढळले. दिवसभरात ३८० जणांना कोरोनाचे ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या कायम असून बुधवारी पुन्हा एकदा सर्वाधिक संख्येने रुग्ण आढळले. दिवसभरात ३८० जणांना कोरोनाचे निदान होतानाच पाच जणांचा मृत्यू झाला आहे. २१५ जण कोरोनामुक्त झाले असलेतरी रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढविणारी ठरत आहे.
सहा महिन्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या बुधवारी नोंदवली गेली. त्यात महापालिका क्षेत्रातील ८४ जणांसह वाळवा तालुक्यात सर्वाधिक ७६ नवे बाधित आढळले आहेत. दिवसभरात पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यात सांगली शहरासह कडेगाव, मिरज, वाळवा आणि तासगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने बुधवारी आरटीपीसीआर अंतर्गत १४११ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात १८९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १४७५ जणांच्या तपासणीतून २०७ जण बाधित आढळले आहेत.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येने ३ हजारांचा टप्पा पार केला असून सध्या ३०६४ जण उपचार घेत आहेत. त्यातील ३६४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ३३१ जण ऑक्सिजनवर तर ३३ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ५३८८८
उपचार घेत असलेले ३०६४
कोरोनामुक्त झालेले ४८९९७
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८२७
बुधवारी दिवसभरात
सांगली ५६
मिरज २८
वाळवा ७६
जत ४३
खानापूर ४०
मिरज तालुका ३२
आटपाडी ३०
कडेगाव २३
तासगाव १८
शिराळा १६
कवठेमहांकाळ ११
पलूस ७
चौकट
मृत्यूचे प्रमाण वाढतेय
गेल्या आठवड्यापासून सरासरी चार जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. अगोदर एकाही मृत्यूची नोंद होत नसल्याने दिलासा मिळत असलातरी आता मृत्यूची संख्या वाढत असल्याने कोरोनास्थिती गंभीर बनत आहे.