जिल्ह्यात ४१ जणांना कोरोना; ३७ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:28 AM2020-12-06T04:28:56+5:302020-12-06T04:28:56+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी वाढ होताना ४१ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. उपचार घेत असलेल्या ३७ जणांनी ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शनिवारी वाढ होताना ४१ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. उपचार घेत असलेल्या ३७ जणांनी कोरोनावर मात केली, तर कडेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रातील बाधितांच्या संख्येत घट झाल्याने दिलासा मिळत आहे.
कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार सुरू असला तरी या आठवडाभरातील आकडेवारी दिलासादायक ठरत आहे. त्यात मृत्यूच्या संख्येतही घट झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी कडेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांच्या संख्येत घट झाली आहे. वाळवा व मिरज तालुक्यात एकाही बाधिताची नोंद झाली नाही.
आरोग्य यंत्रणेच्यावतीने आरटीपीसीआरअंतर्गत ३४९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात १६ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १५६९ नमुन्यांच्या तपासणीत २५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेत असलेल्या ४०३ रुग्णांपैकी ७१ जण ऑक्सिजनवर, तर १९ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
चाैकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४६९९३
उपचार घेत असलेले ४०३
कोरोनामुक्त झालेले ४४८८८
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७०२
शनिवारी दिवसभरात
सांगली ५
मिरज १
आटपाडी, जत प्रत्येकी ९
खानापूर ५
कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ प्रत्येकी ३
शिराळा, पलूस प्रत्येकी २