जिल्ह्यात ४८७ जणांना कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:25 AM2021-04-12T04:25:23+5:302021-04-12T04:25:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी ४८७ जणांना कोरोनाचे निदान होतानाच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. रविवारी ४८७ जणांना कोरोनाचे निदान होतानाच पाच जणांचा मृत्यू झाला आहे. २४१ जण कोरोनामुक्त झाले असले तरी बाधितांची आणि कोरोनाने मृत्यूची वाढती संख्या चिंता वाढविणारी ठरत आहे.
रविवारी दिवसभरात पाच महिन्यातील सर्वाधिक रूग्णांची नोंद होतानाच महापालिका क्षेत्रातील स्थितीही वाढत आहे. १६३ जण बाधित आढळले असून जिल्ह्यातील वाळवा, खानापूर, कडेगाव आणि मिरज तालुक्यात सर्वाधिक रूग्ण आढळले आहेत.
जिल्ह्यातील विविध रूग्णालयात उपचार घेत असलेल्या ३८०६ रूग्णांपैकी ५७८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ५२३ जण ऑक्सिजनवर तर ५५ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आरोग्य विभागाच्या वतीने रविवारी आरटीपीसीआर अंतर्गत १९४२ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ३०७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर रॅपिड अँटिजेनच्या ११८३ जणांच्या तपासणीतून २०० जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.
बाहेरच्या जिल्ह्यासह राज्यातून आलेले अनेकजण बाधित झाले आहेत. यात सोलापूर २, कोल्हापूर ६, सातारा ६, राजस्थान १, कर्नाटक १, पुणे १, हरियाणा १, ठाणे १ आणि आंध्र प्रदेशातून आलेला एकजण बाधित आढळलेला आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ५५५५४
उपचार घेत असलेले ३८०६
कोरोनामुक्त झालेले ४९९०२
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १८४६
रविवारी दिवसभरात
सांगली ११२
मिरज ५१
खानापूर ६६
मिरज तालुका ६१
वाळवा ५४
कडेगाव ४३
तासगाव ३९
जत १५
शिराळा, पलूस प्रत्येकी १४
आटपाडी, कवठेमहांकाळ प्रत्येकी ९