जिल्ह्यात ८९५ जणांना कोरोना; १३२० जण कोरोनामु्क्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:19 AM2021-06-03T04:19:10+5:302021-06-03T04:19:10+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा घट होताना बुधवारी नव्या ८९५ रुग्णांची नोंद झाली. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा घट होताना बुधवारी नव्या ८९५ रुग्णांची नोंद झाली. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून १३२० कोरोनामुक्त झाले तर परजिल्ह्यातील तिघांसह जिल्ह्यातील ३० जणांचा मृत्यू झाला. म्युकरमायकोसिसचे नवे १३ रुग्ण आढळले आहेत.
सलग चौथ्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील ३० जणांचा मृत्यू झाला असून सांगली ३, मिरज ५, वाळवा ६, तासगाव ५, खानापूर, मिरज तालुक्यात प्रत्येकी ३, जत, पलूस प्रत्येकी २ आणि शिराळा तालुक्यात एकाचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य यंत्रणेने चाचण्यांचे प्रमाण वाढवले असून बुधवारी आरटीपीसीआर अंतर्गत २४३७ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ३२४ जण पॉझिटिव्ह आढळले तर रॅपिड ॲन्टिजनच्या ५००१ जणांच्या नमुने तपासणीतून ५८७ जण बाधित आढळले आहेत.
उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येतील घटही कायम असून सध्या ११ हजार ७ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातील १६५२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १४०१ जण ऑक्सिजनवर तर २४१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू झाला तर १६ नवे रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
चाैकट
म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येतील वाढ कायम असून बुधवारी १३ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १२०२६९
उपचार घेत असलेले ११००७
कोरोनामुक्त झालेले १०५७८२
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३४८०
पॉझिटिव्हिटी रेट १२.२५
बुधवारी दिवसभरात
सांगली १२७
मिरज २४
वाळवा २१९
मिरज तालुका ९७
शिराळा ७३
पलूस ६४
कवठेमहांकाळ ५८
कडेगाव ५७
तासगाव, जत प्रत्येकी ४९
खानापूर ४४
आटपाडी ३४