जिल्ह्यात ९३२ जणांना कोरोना; १६ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:17 AM2021-07-22T04:17:58+5:302021-07-22T04:17:58+5:30
सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून साडे आठशेवर आलेल्या रुग्णसंख्येत बुधवारी पुन्हा एकदा वाढ झाली. दिवसभरात ९३२ नवे रुग्ण ...
सांगली : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून साडे आठशेवर आलेल्या रुग्णसंख्येत बुधवारी पुन्हा एकदा वाढ झाली. दिवसभरात ९३२ नवे रुग्ण आढळून येतानाच, परजिल्ह्यातील सहा जणांसह जिल्ह्यातील १० अशा १६ जणांचा मृत्यू झाला. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत १,२५९ जण कोरोनामुक्त झाले. म्युकरमायकोसिसचे दोन नवे रुग्ण आढळले.
महिनाभराच्या कालावधीनंतर मृत्यूची संख्या कमी झाली असली, तरी रुग्णसंख्या वाढल्याने चिंता कायम आहे. जिल्ह्यातील १० जणांचा मृत्यू झाला, त्यात सांगली २, मिरज १, खानापूर, मिरज तालुक्यात प्रत्येकी २, आटपाडी, जत, वाळवा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य यंत्रणेने आरटीपीसीआरच्या अंतर्गत ४,०९९ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ३०७ जण पॉझिटिव्ह आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ९,९३६ जणांच्या तपासणीतून ६४९ जण बाधित आढळले.
उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत घट होत झाली असून, सध्या ९ हजार ९९१ जण उपचार घेत आहेत. त्यातील १,०४९ जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील ८८२ जण ऑक्सिजनवर तर १६७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील सहा जणांचा मृत्यू तर २४ नवे रुग्ण दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १,६७,२९५
उपचार घेत असलेले ९,९९१
कोरोनामुक्त झालेले १,५२,८६१
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४,४४३
पॉझिटिव्हीटी रेट ७.४८
बुधवारी दिवसभरात
सांगली १६५
मिरज ३०
आटपाडी ४४
कडेगाव १०१
खानापूर ९१
पलूस ६५
तासगाव ८३
जत ७२
कवठेमहांकाळ २२
मिरज ५९
शिराळा १७
वाळवा १८३