जिल्ह्यात ९४५ जणांना कोरोना; २५ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:17 AM2021-07-12T04:17:48+5:302021-07-12T04:17:48+5:30

सांगली : जिल्ह्यातील नव्या कोरोनारुग्णांची स्थिर संख्या रविवारीही कायम होती. दिवसभरात ९४५ जण आढळून येतानाच जिल्ह्यातील २५ जणांचा मृत्यू ...

Corona to 945 people in the district; 25 killed | जिल्ह्यात ९४५ जणांना कोरोना; २५ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात ९४५ जणांना कोरोना; २५ जणांचा मृत्यू

Next

सांगली : जिल्ह्यातील नव्या कोरोनारुग्णांची स्थिर संख्या रविवारीही कायम होती. दिवसभरात ९४५ जण आढळून येतानाच जिल्ह्यातील २५ जणांचा मृत्यू झाला. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढत १११९ जण कोरोनामुक्त झाले.

कोरोनाने मृत्यूसंख्येत रविवारी वाढ होत २५ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली २, कुपवाड १, वाळवा ७, मिरज तालुका ४, तासगाव ३, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ प्रत्येकी २, कडेगाव आणि जत तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

शनिवारी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दहा हजारावर गेली होती. त्यात रविवारी काहीशी घट झाली. सध्या ९ हजार ८११ जण उपचार घेत असून त्यातील ९८३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ८२८ जण ऑक्सिजनवर तर १५५ जण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत.

आरोग्य विभागाने चाचण्यांचे वाढविलेले प्रमाण रविवारीही कायम ठेवले होते. दिवसभरात आरटीपीसीआर अंतर्गत ३३०४ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ४०४ जण बाधित आढळले तर रॅपिड ॲंटिजनच्या ९४२१ जणांच्या नमुने चाचणीतून ५६२ पॉझिटिव्ह आढळले. परजिल्ह्यातील नवे २१ रुग्ण उपचारास दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १५६९९८

उपचार घेत असलेले ९८११

कोरोनामुक्त झालेले १४२९१२

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४२७५

पॉझिटिव्हीटी रेट ७.५९

रविवारी दिवसभरात

सांगली ९८

मिरज २८

आटपाडी ५३

कडेगाव १०८

खानापूर ९९

पलूस ८६

तासगाव ५८

जत ५३

कवठेमहांकाळ ७७

मिरज तालुका ९१

शिराळा ६०

वाळवा १३४

चौकट

आठ हजारांवर रुग्ण होम आयसोलेशनमध्ये

जिल्ह्यातील रुग्णसंख्या व उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. पंधरवड्यापूर्वी सहा हजारांवर रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत होते. त्यात वाढ होत आता ८ हजार १३३ जण होम आयसोलेशनमध्य उपचार घेत आहेत.

Web Title: Corona to 945 people in the district; 25 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.