जिल्ह्यात ९८१ जणांना कोरोना; ११३० कोराेनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:20 AM2021-06-01T04:20:44+5:302021-06-01T04:20:44+5:30

सांगली : जिल्ह्यातील बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण सोमवारीही कायम राहिल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवारी दिवसभरात ९८१ जणांना निदान झाले, ...

Corona to 981 people in the district; 1130 Koranamukta | जिल्ह्यात ९८१ जणांना कोरोना; ११३० कोराेनामुक्त

जिल्ह्यात ९८१ जणांना कोरोना; ११३० कोराेनामुक्त

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यातील बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण सोमवारीही कायम राहिल्याने दिलासा मिळाला आहे. सोमवारी दिवसभरात ९८१ जणांना निदान झाले, तर १,१३० जण कोरोनामुक्त झाले. सोमवारी परजिल्ह्यातील ८ जणांसह जिल्ह्यातील २३ जणांचा मृत्यू झाला आहे. म्युकरमायकोसिसचे नवे ९ रूग्ण आढळले आहेत.

सलग दुसऱ्या दिवशी एक हजारांच्या आत रूग्णांची नोंद होतानाच बरे होणाऱ्यांचेही प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यातील २३ जणांचा मृत्यू झाला असून, यात सांगली ४, मिरज २, कुपवाड १, वाळवा ४, कडेगाव, खानापूर, तासगाव आणि मिरज तालुक्यातील प्रत्येकी २, आटपाडी, जत, पलूस आणि शिराळा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

तसेच उपचार घेणाऱ्या रूग्णांच्या संख्येतील घट कायम असून, सध्या ११ हजार ९३३ जण उपचार घेत आहेत तर १,८१३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १,५७६ जण ऑक्सिजनवर तर २३७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

आरोग्य यंत्रणेने सोमवारी आरटीपीसीआर अंतर्गत घेतलेल्या २,०७१ जणांच्या नमुने तपासणीतून ४१९ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे तर रॅपिड ॲन्टिजनच्या ३,५३४ जणांच्या नमुने तपासणीतून ५८० जण पाॅझिटिव्ह आढळले आहेत.

परजिल्ह्यातील आठजणांचा मृत्यू झाला असून, १८ नवे रूग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत.

चौकट

म्युकरमायकोसिसचे नवे ९ रूग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. यामुळे बाधितांची संख्या १६९ झाली असून, उपचारानंतर आतापर्यंत ७ जण बरे झाले आहेत.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १,१८,३६७

उपचार घेत असलेले ११,९३३

कोरोनामुक्त झालेले १,०३,०१०

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३,४२४

सोमवारी दिवसभरात

सांगली ७५

मिरज २७

वाळवा १७१

शिराळा १३२

मिरज तालुका ११४

जत १०८

खानापूर ८७

कवठेमहांकाळ ७६

कडेगाव ६६

तासगाव ६२

पलूस ३९

आटपाडी २४

Web Title: Corona to 981 people in the district; 1130 Koranamukta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.