जिल्ह्यात ९९५ जणांना कोरोना; ‘म्युकर’चे नवे सात रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:18 AM2021-07-08T04:18:21+5:302021-07-08T04:18:21+5:30
मंगळवारी आठशेवर आलेली रुग्णसंख्या बुधवारी पु्न्हा हजारच्या उंबरठ्यावर पोहोचली. जिल्ह्यातील ११ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली २, खानापूर ३, ...
मंगळवारी आठशेवर आलेली रुग्णसंख्या बुधवारी पु्न्हा हजारच्या उंबरठ्यावर पोहोचली. जिल्ह्यातील ११ जणांचा मृत्यू झाला. त्यात सांगली २, खानापूर ३, वाळवा, मिरज तालुक्यांत प्रत्येकी २, पलूस, शिराळा प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत २९६२ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात २५० जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ९९४४ जणांच्या नमुने तपासणीतून ७५८ जणांना कोरोनाचे निदान झाले.
उपचार घेत असलेल्या ९ हजार ७१५ रुग्णांपैकी १०३० रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील ८८० जण ऑक्सिजनवर तर १५० जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू, तर १३ नवे रुग्ण उपचारास दाखल झाले आहेत.
चौकट
म्युकरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत बुधवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात सातजणांना निदान झाले, तर एकाचा मृत्यू झाला.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित
सांगली १४६
मिरज ३१
आटपाडी ४९
कडेगाव ७०
खानापूर ४८
पलूस ८७
तासगाव ११०
जत २३
कवठेमहांकाळ ५९
मिरज तालुका ८८
शिराळा ५०
वाळवा २३४