कोरोनामुळे वांगीतील यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:34 AM2021-02-27T04:34:19+5:302021-02-27T04:34:19+5:30
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे माघी पौर्णिमेला भरणारी ग्रामदैवत श्री अंबिकादेवीची यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे, अशी ...
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे माघी पौर्णिमेला भरणारी ग्रामदैवत श्री अंबिकादेवीची यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती सरपंच डॉ. विजय होनमाने यांनी दिली.
मात्र, शुक्रवारी अत्यंत साध्या पद्धतीने केवळ बारा बलुतेदारांमार्फत देवीच्या पालखीची मिरवणूक पार पडली.
सुमारे १०० वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेली आणि सलग १० दिवस चालणारी वांगीची यात्रा सांगलीसह सातारा व कोल्हापूर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. खिलार जनावरांचाही सर्वांत मोठी बाजार यावेळी भरतो, शिवाय खरेदी-विक्रीची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. मात्र, यंदा कोरोनामुळे ही यंदा यात्रा रद्द करण्यात आली आहे. याची सर्व भाविक, व्यापारी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सरपंच होनमाने यांनी केले आहे.
शुक्रवारी सायंकाळी गावच्या १२ बलुतेदारांच्या उपस्थितीत पालखी सोहळा पार पडला.
यावेळी कोरोनासंदर्भात सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली होती. उपसरपंच विद्या पाटणकर, राहुल साळुंखे, बाबासाहेब सूर्यवंशी, यशवंत कांबळे, संजय कदम, काशिनाथ तांदळे, धनाजी सूर्यवंशी, नीलेश गुरव उपस्थित होते.