गणेशनगरमध्ये ५० बेडचे कोरोना केअर सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:26 AM2021-05-09T04:26:29+5:302021-05-09T04:26:29+5:30
कोरोना संकटाच्या काळात शहरातील काँग्रेस नगरसेवकांनी रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कोरोना केअर सेंटर, जेवण वाटपासारखे उपक्रम काही काँग्रेस ...
कोरोना संकटाच्या काळात शहरातील काँग्रेस नगरसेवकांनी रुग्णांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. कोरोना केअर सेंटर, जेवण वाटपासारखे उपक्रम काही काँग्रेस नगरसेवकांनी सुरू केले आहेत. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे नगरसेबक अभिजीत भोसले यांनी त्यांच्या प्रभागात ३५ बेडचे कोरोना केअर सेंटर सुरू केले आहे. त्याच धर्तीवर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक मंगेश चव्हाण यांनीही कोरोना केअर सेंटर उभा केले आहे. शहरातील गणेशनगर येथील रोटरी क्लबच्या हॉलमध्ये ५० बेडचे कोरोना केअर सेंटर नगरसेवक चव्हाण यांच्या पुढाकाराने उभा करण्यात आले आहे. यामध्ये १० ऑक्सिजन बेडचीही सोय करण्यात आली आहे. महिला रुग्णांसाठी स्वतंत्र उपचाराची सोय आहे. संपूर्ण औषधोपचार मोफत करण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त राहुल रोकडे यांनी शुक्रवारी कोरोना केअर सेंटरला भेट दिली. संपूर्ण तयारीची माहिती घेतली. माजी नगरसेवक किशोर लाटणे, विजय आवळे, अथर्व कराडकर, विनायक लाटणे, सागर मुळे आदींनी या केअर सेंटरसाठी परिश्रम घेतले आहेत.