शिगावात कोरोना आपत्ती व्यवस्थापनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:44 AM2021-05-05T04:44:05+5:302021-05-05T04:44:05+5:30
पाटील म्हणाले, होम कॉरण्टाइन असूनही गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असणारे पेशंट फिरत आहेत. त्यांना किमान १४ दिवस घराबाहेर पडू देऊ ...
पाटील म्हणाले, होम कॉरण्टाइन असूनही गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह असणारे पेशंट फिरत आहेत. त्यांना किमान १४ दिवस घराबाहेर पडू देऊ नये. वैद्यकीय सेवा, मेडिकल, दूध व्यवसाय आणि शेतीची कामे सोडून सर्व व्यवहार किमान पाच ते सात दिवस पूर्ण बंद करावे. सर्वांना नियमावली सारखीच असावी. काही ठिकाणी प्रतिबंधक क्षेत्र केले जाते, तर काही ठिकाणी केले जात नाही असे न करता कडक नियम करावेत. गावामध्ये विनामास्क फिरू देऊ नये, गावात चौकाचौकात बसणाऱ्या नागरिकांवर कडक दंडात्मक कारवाई करावी. गावाबाहेरून काही लोक गावामध्ये आले आहेत, त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी व त्यांना १४ दिवस घरी कॉरण्टाइन करावे. गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट वाढत चालली आहे? परंतु अजूनही संपूर्ण गाव निर्जंतुकीकरण केलेले नाही, असा आरोपही त्यांनी केला.