पंधरा जणांना कोरोना; अकरा जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:30 AM2021-01-16T04:30:13+5:302021-01-16T04:30:13+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी १५ रुग्णांची वाढ झाली. बाधितांची संख्या पुन्हा एकदा कमी होताना बरे होणाऱ्यांचे प्रमाणही ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी १५ रुग्णांची वाढ झाली. बाधितांची संख्या पुन्हा एकदा कमी होताना बरे होणाऱ्यांचे प्रमाणही समाधानकारक आहे. जिल्ह्यात ११ जण कोरोनामुक्त होतानाच सांगली शहरातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यातील बाधितांची संख्या मर्यादित राहताना जिल्ह्यात कडेगाव, कवठेमहांकाळ, मिरज, शिराळा आणि पलूस तालुक्यात एकाही बाधिताची नोंद झालेली नाही.
आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआरच्या घेतलेल्या २२६ जणांच्या नमुन्यांच्या चाचणीत ५ जणांना बाधा झाली आहे, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ६२० चाचण्यांमधून १० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
जिल्ह्यातील सहा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २३१ रुग्णांपैकी ५५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात ४६ जण ऑक्सिजनवर तर १२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. गंभीर रुग्णांच्या संख्येत या दोन दिवसांत वाढ झाली आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७८७९
उपचार घेत असलेले २३१
कोरोनामुक्त झालेले ४५९०८
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७४०
गुरुवारी दिवसभरात
सांगली ०
मिरज १
आटपाडी २
जत २
कडेगाव ०
कवठेमहांकाळ ०
खानापूर १
मिरज ०
पलूस ०
शिराळा ०
तासगाव ८
वाळवा १