सांगली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला, दिवसभरात १३ नवे रुग्ण
By शीतल पाटील | Published: April 3, 2023 08:47 PM2023-04-03T20:47:15+5:302023-04-03T20:47:23+5:30
दोघांची प्रकृती चिंताजनक
सांगली : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. सोमवारी दिवसभरात १३ नवे रुग्ण आढळून आले. आजअखेर ४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. सोमवारी खानापूर तालुक्यात ४, तासगाव ३ व कवठेमहांकाळ तालुक्यात दोन रुग्ण आढळले, महापालिका क्षेत्रात सांगलीत ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. एकूण ४२ रुग्णांवर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यापैकी एकजण ऑक्सीजनवर तर एकजन नाॅन इन्व्हेजीव व्हेटिंलेटरवर आहे. आरटीपीसीआरच्या ४१ चाचण्यात सात तर अँटीजेनच्या १७८ चाचण्यात ८ कोरोना रुग्ण सापडले. कर्नाटक व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक रुग्ण सांगलीत उपचारासाठी दाखल झाला आहे. दिवसभरात १४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.