बोरगावमध्ये बंदमुळे कोरोनाला अटकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:23 AM2021-04-26T04:23:26+5:302021-04-26T04:23:26+5:30
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आठ दिवस गाव बंद लागू करण्यात आले असून त्याचा फायदा ...
बोरगाव : बोरगाव (ता. वाळवा) येथे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आठ दिवस गाव बंद लागू करण्यात आले असून त्याचा फायदा झाला आहे.
यामुळे गावात गेले चार दिवस रुग्णांच्या प्रमाणात कमालीची घटत झाली आहे.
मागील आठवड्यात कोरोनामुळे गाव हाॅटस्पाॅट बनते की काय, अशी अवस्था झाली होती. यावर ग्रामपंचायतीने व आरोग्य विभागाने ठोस पावले उचलत अनेक उपाययोजना राबविल्या. गाव बंदला तहसीलदार व प्रांताधिकारी यांचा विरोध होता; पण वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन गाव आठ दिवस बंद ठेवण्यात आले. संपूर्ण गावात सॅनिटायझर व धुराची फवारणी करण्यात आली.
आरोग्य विभाग व दक्षता कमिटीने घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी व उपाययोजना केल्यानेच कोरोना आटोक्यात आणण्यात यश आल्याचे उपसरपंच सूर्यकांत पाटील यांनी सांगितले.
सोमवारी ग्रामपंचायतीने आठ दिवसांचा लाॅकडाऊन संपत आहे तरीदेखील ३० एप्रिलपर्यंत शासकीय नियमानुसार सर्व व्यवहार बंद व नियम पाळण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्यांवर ग्रामपंचायतीच्या वतीने दंडात्मक कारवाई करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.