ऊन-पावसाच्या खेळात कोरोना बाधित घामाघूम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:32 AM2021-04-30T04:32:20+5:302021-04-30T04:32:20+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे झपाट्याने वाढत असताना, वातावरणही चांगलेच बदलत आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात वळीवाच्या पावसाने हजेरी ...

Corona Interrupted Sweat in Wool-Rain Sports! | ऊन-पावसाच्या खेळात कोरोना बाधित घामाघूम!

ऊन-पावसाच्या खेळात कोरोना बाधित घामाघूम!

Next

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या एकीकडे झपाट्याने वाढत असताना, वातावरणही चांगलेच बदलत आहे. गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात वळीवाच्या पावसाने हजेरी लावल्याने कधी पाऊस तर कधी कडक उन्हे असे वातावरण आहे. वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पावसाने लाईट जात असल्याने कोरोनाबाधित घामाघूम हाेत आहेत.

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी जिल्ह्यात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी ऑक्सिजन बेडची सोय असल्याने मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी कोविड सेंटर उपयोगी ठरत आहे. मात्र, सध्याच्या वातावरणात या सेंटरमधील रुग्णांची तगमग होत आहे.

सध्या उन्हाचा पाराही वाढत असून कोविड सेंटरमध्ये फॅनची सोय असलीतरी कुलरही असावा ही अपेक्षा आहे. त्याशिवाय इतरही सुविधा आवश्यक आहेत.

वादळवाऱ्यासह होत असलेल्या वळीवाच्या पावसामुळे ग्रामीण भागात वारंवार वीज जात असून कोविड केअर सेंटरमध्ये जनरेटरचीही सोय करण्याची आवश्यकता आहे. लाईट गेल्यानंतर रुग्णांवर उपचारासाठीही अडचणी येत आहेत.

कोरोनाचा संसर्ग वाढतच असल्याने व आता कडक उन्हाचेही दिवस असल्याने कोरोनाबाधितांच्या सोयीसाठी जनरेटर व कुलरची सोय करण्याची मागणी होत आहे.

चौकट

मे महिन्यातही लाही लाही

* एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत असून तापमानातही वाढ होत आहे. कोविड केअर सेंटरसाठीची इमारत हवेशीर असल्यातरीही उन्हाच्या झळांमुळे रूग्णांना त्रास होतो आहे.

* कोविड केअर सेंटरमध्ये जनरेटरची सोय केल्यास विनाखंडीत वीजपुरवठा होऊ शकतो. यासाठी प्रशासनाने जनरेटरची व्यवस्था केल्यास लोड शेडींग व इतरवेळी वीज गेल्यास रूग्णांना मदत होणार आहे.

* एप्रिल पाठोपाठ मे महिन्यातही उन्हाची तीव्रता वाढतच राहणार आहे. त्यामुळे बाधितांच्या सोयीसाठी नियाेजन केल्यास दिलासा मिळणार आहे.

कोट

कोरोना उपचारासाठी दाखल आहे. डॉक्टरांकडून योग्य आणि समाधानकारक उपचार होत आहेत. त्याबददल काहीही तक्रार नाही. मात्र, सध्या वारंवार लाईट जात असल्याने फॅन बंद राहतात. त्यामुळे खूप त्रास होत आहे.

कोट

कोविड केअर सेंटरमध्ये इतर सुविधा चांगल्या आहेत मात्र, किमान कुलरची सोय करायला हवी. उन्हाचा तडाखा वाढत आहे. त्यात पाऊस झाल्यानंतर पुन्हा खूपच उकाडा जाणवतो. पावसामुळे लाईट गेल्यानंतरही त्रास जाणवतो. प्रशासनाने रूग्णांसाठी ही सोय करावी.

चौकट

जिल्ह्यातील एकूण कोविड केअर सेंटर ---

दाखल रूग्णांची संख्या ---

Web Title: Corona Interrupted Sweat in Wool-Rain Sports!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.