जिल्ह्यात एकाच दिवसात १८६ जणांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:25 AM2021-03-20T04:25:19+5:302021-03-20T04:25:19+5:30

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी विक्रमी संख्येने वाढ झाली. एकाच दिवसात तब्बल १८६ नवे रुग्ण आढळले असून गेल्या ...

Corona killed 186 people in a single day in the district | जिल्ह्यात एकाच दिवसात १८६ जणांना कोरोना

जिल्ह्यात एकाच दिवसात १८६ जणांना कोरोना

googlenewsNext

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत शुक्रवारी विक्रमी संख्येने वाढ झाली. एकाच दिवसात तब्बल १८६ नवे रुग्ण आढळले असून गेल्या पाच महिन्यातील ही सर्वाधिक संख्या आहे. महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ५९ रुग्ण असून जत, वाळवा आणि मिरज तालुक्यातही रुग्णसंख्येत वाढ होत आहे.

आठवडाभरापासून कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यातील संसर्ग वाढताना दिसत आहे. तीन दिवसांपासून ७० पेक्षा रुग्ण आढळून येत असतानाच शुक्रवारी त्यात विक्रमी संख्येने वाढ झाली आहे. दिवसात सांगलीत ४०, मिरजेत १९ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय जत तालुक्यात २६,मिरज तालुक्यात २२ आणि वाळवा तालुक्यात २० रुग्ण आढळले आहेत.

आरोग्य विभागाच्यावतीने शुक्रवारी दिवसभरात आरटीपीसीआर अंतर्गत १०४६ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली त्यात १३७ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर रॅपिड ॲन्टिजेनच्या १०६६ चाचण्यांमधून ५४ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. चाचणीचेही प्रमाण वाढविण्यात आले आहे.

उपचारासाठी दाखल रूग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. सध्या ६६७ उपचार घेत असून त्यातील ५९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ५१ जण ऑक्सिजनवर तर ८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. सातारा जिल्ह्यातील दोनसह कोल्हापूर, पुणे आणि बेळगाव जिल्ह्यातील प्रत्येकी एकास कोरोनाचे निदान झाले आहे.सध्या होम आयसोलेशनमध्ये ५२३ रुग्ण असून ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ६६० वर पोहोचली आहे.

चौकट

महापालिका क्षेत्रात चिंताजनक आकडेवारी

आठवडाभरापासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा एकदा वाढत असताना, महापालिका क्षेत्रात सर्वाधिक संख्या आढळून येत आहेत. शुक्रवारीही दिवसभरात ५९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

चौकट

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४९४१७

उपचार घेत असलेले ६६७

कोरोनामुक्त झालेले ४६९७९

आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७७१

शुक्रवारी दिवसभरात

सांगली ४०

मिरज १९

जत २६

मिरज तालुका २२

वाळवा २०

कवठेमहांकाळ १७

आटपाडी १६

कडेगाव १०

पलूस ६

तासगाव ५

शिराळा ३

खानापूर २

Web Title: Corona killed 186 people in a single day in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.