जिल्ह्यात कोरोनाने ५४ जणांचा मृत्यू; १३६३ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:33 AM2021-04-30T04:33:24+5:302021-04-30T04:33:24+5:30
सांगली : जिल्ह्यात कोरोनाने मृतांच्या संख्येतील वाढ कायम असून, जिल्ह्यातील ३९ जणांसह परजिल्ह्यातील १५ अशा ५४ जणांचा बुधवारी मृत्यू ...
सांगली : जिल्ह्यात कोरोनाने मृतांच्या संख्येतील वाढ कायम असून, जिल्ह्यातील ३९ जणांसह परजिल्ह्यातील १५ अशा ५४ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. दिवसभरात १३६३ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. महापालिका क्षेत्रात २६६, तर खानापूर तालुक्यात २२० नवे रुग्ण आढळले आहेत. ९२५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाने मृत्यूच्या संख्येतील वाढ चिंतनीय असून, ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात सांगली, मिरज प्रत्येकी चार यासह वाळवा तालुक्यात ८, मिरज, तासगाव तालुक्यात प्रत्येकी पाच, जत, खानापूर प्रत्येकी चार, कवठेमहांकाळ तीन, पलूस, कडेगाव तालुक्यात प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने बुधवारी आरटीपीसीआर अंतर्गत २४८५ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ८२४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर रॅपिड ॲन्टिजेनच्या २६५८ जणांच्या तपासणीतून ६०२ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १२,४४४ वर पोहोचली असून, त्यातील १९८५ जणांची प्रकृती चिंजाजनक आहे. त्यातील १७७० जण ऑक्सिजनवर तर २१५ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यातील १५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ६३ नवे रुग्ण आढळले आहेत.
चाैकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ७३,०९०
उपचार घेत असलेले १२,४४४
कोरोनामुक्त झालेले ५८,४४०
आतापर्यंतचे एकूण मृत्यू २२०६
बुधवारी दिवसभरात
सांगली १७६
मिरज ९०
खानापूर २२०
मिरज तालुका १८१
आटपाडी १४८
तासगाव १२७
जत १००
कवठेमहांकाळ ८२
शिराळा ८०
पलूस ६४
वाळवा ५९
कडेगाव ३६