corona virus : मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 18:05 IST2020-08-13T18:03:58+5:302020-08-13T18:05:15+5:30
मिरजेचे आमदार, माजी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचे निदान झाल्यानंतर खाडे यांना मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कोणतीही लक्षणे नसल्याने कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

corona virus : मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांना कोरोना
सांगली: मिरजेचे आमदार, माजी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचे निदान झाल्यानंतर खाडे यांना मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कोणतीही लक्षणे नसल्याने कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
खाडे यांच्या कुटुंबातील सहा जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. त्याच बरोबर त्यांच्या संपर्कात आलेले त्यांची स्वीय सहाय्यक व सुरक्षारक्षकांची ही चाचणी करण्यात आली आहे. आमदार खाडे यांना कोरोनाचे निदान झाल्यानंतर मिरज येथील रुग्णालयात ते दाखल आहेत. मात्र कोणतीही लक्षणे नसल्याने कार्यकर्त्यांनी काळजी करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.