कोरोना रुग्णसंख्या घटली; वाढते मृत्युसत्र कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:19 AM2021-06-18T04:19:42+5:302021-06-18T04:19:42+5:30
सांगली : आठवडाभरापासून स्थिर असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी घट झाली. दिवसभरात ८७७ नवे रुग्ण आढळून आले, तर ५८७ जण ...
सांगली : आठवडाभरापासून स्थिर असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत गुरुवारी घट झाली. दिवसभरात ८७७ नवे रुग्ण आढळून आले, तर ५८७ जण कोरोनामुक्त झाले. मृत्युसत्र कायम असून, जिल्ह्यातील २५ जणांचा कोरोनाने तर दोघांचा म्युकरमायकोसिसने मृत्यू झाला.
जिल्ह्यातील २५ जणांचा मृत्यू झाला त्यात सांगली १, वाळवा ८, शिराळा ४, जत, कवठेमहांकाळ, पलूस आणि मिरज तालुक्यात प्रत्येकी २, आटपाडी, कडेगाव, खानापूर, तासगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
आराेग्य यंत्रणेने आरटीपीसीआरअंतर्गत २,५७४ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली त्यात ३६६ जण पॉझिटिव्ह आढळले, तर रॅपिड ॲन्टिजनच्या ७१५२ जणांच्या नमुना तपासणीतून ५२६ जणांना कोरोनाचे निदान झाले.
उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येत वाढ होत सध्या ९ हजार ३१६ जण उपचार घेत आहेत त्यात १११३ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ९०१ जण ऑक्सिजनवर, तर २१२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील १५ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले.
चौकट
म्युकरमायकोसिसचा नवीन एकही रुग्ण गुरुवारी आढळला नाही. मात्र, उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १,३३,९५३
उपचार घेत असलेले ९,३१६
कोरोनामुक्त झालेले १,२०,८१६
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३,८२१
पॉझिटिव्हिटी रेट ९.१८ टक्के
गुरुवारी दिवसभरात
सांगली ९८
मिरज २४
आटपाडी ४२
कडेगाव ६२
खानापूर ६५
पलूस ७२
तासगाव ११४
जत ५५
कवठेमहांकाळ ३१
मिरज तालुका ९०
शिराळा ४३
वाळवा १८१