सांगलीच्या कोरोना नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्याला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:30 PM2020-07-23T12:30:03+5:302020-07-23T13:19:24+5:30
सांगली जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा, प्रशासनाशी समन्वय व इतर माहिती संकलनासाठी जिल्हा परिषदेत सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातच आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या कक्षात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सांगली : जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा, प्रशासनाशी समन्वय व इतर माहिती संकलनासाठी जिल्हा परिषदेत सुरू करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातच आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या कक्षात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सांगली जिल्ह्यातील शहरांमध्ये कडक लॉकडाऊन सुरू झाला आहे. जिल्हा परिषदेतील कोरोना कक्षातील अधिकाऱ्यालाही कोरोना झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या १२१५ झाली आहे, तर त्यातील ६३४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
बुधवारी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेल्या एक ठेकेदार जिल्हा परिषदेत फिरून गेल्याने अगोदरच सर्वजण चिंतेत असताना आता एका अधिकाऱ्यांसही कोरोनाचे निदान झाले आहे.
बुधवारी सांगलीच्या शासकीय रूग्णालयातील ११ कर्मचाऱ्यांनाही कोरोनाचे निदान झाले होते. त्यात आता कोरोनाचे कामकाज चालणाºया नियंत्रण कक्षातच झालेल्या शिरकावामुळे सतर्कता बाळगली जात आहे. या कक्षातील आणखी दोन अधिकाऱ्यांनाही तापाची लक्षणे असल्याचे सांगण्यात आले.