म्हैसाळच्या शाळेत एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह, सर्वांचे घेतले स्वॅब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 01:13 PM2021-03-18T13:13:13+5:302021-03-18T13:14:34+5:30
CoronaVirus Mirja Sangli School- म्हैसाळ ता.मिरज येथील एका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने म्हैसाळ येथे खळबळ उडाली असून आतापर्यंत ७४ विध्यार्थ्यांचे तर २५ शिक्षकांचे स्वॅब घेण्यात आले असून आता जवळपास ६० विद्यार्थ्यांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे.
म्हैसाळ : म्हैसाळ ता.मिरज येथील एका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने म्हैसाळ येथे खळबळ उडाली असून आतापर्यंत ७४ विध्यार्थ्यांचे तर २५ शिक्षकांचे स्वॅब घेण्यात आले असून आता जवळपास ६० विद्यार्थ्यांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे.
म्हैसाळ येथील एका महाविद्यालयातील शिक्षक १७ मार्चला कोरोना पाँझिटिव्ह आले.त्यानंतर लगेचच शालेय प्रशासनाच्या वतीने सल्लागार समितीची व शालेय शिक्षकाची बैठक घेऊन शाळा १४ दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानंतर शालेय शिक्षकांनी यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र म्हैसाळ, जिल्हापरिषद व शाळेच्या संस्थेला दिली. संपर्कात आलेल्या जवळपास ७४ विध्यार्थ्यांचे तर २५ शिक्षकांचे प्राथमिक आरोग्य केद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्वॅब घेतले असून आता ६० विध्यार्थ्यांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे.
शिक्षक कोरोना चाचणी पाँझिटिव्ह आल्यानंतर काल आम्ही विध्यार्थ्यांचे व शिक्षकांचे असे एकूण ९८ जणाचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी लँबला पाठविले आहेत.आज ६० जणाचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे. शिक्षकांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.
-विजय पाटील
वैद्यकीय अधिकारी,
प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हैसाळ.
आमच्या विद्यालयातील शिक्षक कोरोना पाँझिटिव्ह आल्यानंतर आम्ही शालेय सल्लागार समिती व शिक्षक यांची मिंटिंग घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तशी माहिती आम्ही आमच्या वरीष्ठ कार्यालयाला कळवली आहे. सोशल डिस्टंस वापरून विध्यार्थ्यांचे स्वॅब घेतले जात आहेत. कोणीही घाबरून जाऊ नये.
- संजय दबडे,
शिक्षक, म्हैसाळ.