corona in sangli-कोरोनामुक्त 22 व्यक्तींना डिस्चार्ज तर 97 व्यक्ती इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 11:13 AM2020-04-13T11:13:37+5:302020-04-13T11:18:09+5:30
सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आलेले, सस्पेक्टस व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अशा आतापर्यंत 1592 व्यक्ती आहेत. यापैकी 283 व्यक्ती आयसोलेशन कक्षात दाखल करून या सर्व व्यक्तींची कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 236 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत.
सांगली : सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आलेले, सस्पेक्टस व कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अशा आतापर्यंत 1592 व्यक्ती आहेत. यापैकी 283 व्यक्ती आयसोलेशन कक्षात दाखल करून या सर्व व्यक्तींची कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 236 जणांचे स्वॅब निगेटीव्ह आले आहेत.
सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 26 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. यामधील निगेटिव्ह अहवाल आलेल्यांपैकी 22 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे . कोरोणाबाधित दोन व्यक्तींसह अन्य दोन व्यक्ती मिरज येथे आयसोलेशन कक्षात उपचार घेत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. 19 व्यक्तींचे स्वॅब तपासणीचे अहवाल अद्याप अप्राप्त आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली आहे.
इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये 97 व्यक्ती (मिरज येथे 52, इस्लामपूर येथे 23 व शासकीय तंत्रनिकेतन 22) असून होम क्वॉरंटाईन असलेल्या 1212 व्यक्तींपैकी 663 व्यक्तींचा 14 दिवसाचा होम क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. सद्यस्थितीत 549 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.