corona in sangli : कोरोना मुक्ती ही सर्व यंत्रणांच्या सामूहीक प्रयत्नाचे यश :अभिजित चौधरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2020 07:59 PM2020-04-11T19:59:17+5:302020-04-11T20:20:08+5:30
जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २६ वर गेल्याने सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण होते. मात्र, नियमांची काटेकोर अंंमलबजावणी केल्याने जिल्ह्यातील २५ जण कोरोना मुक्त झाले आहेत. सर्व यंत्रणेचे समन्वय व केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळेच हे यश मिळाले असून आता जिल्ह्यातील जनतेने गाफील न राहता सतर्क राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केले.
सांगली : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या २६ वर गेल्याने सर्वत्र अस्वस्थतेचे वातावरण होते. मात्र, नियमांची काटेकोर अंंमलबजावणी केल्याने जिल्ह्यातील २५ जण कोरोना मुक्त झाले आहेत. सर्व यंत्रणेचे समन्वय व केलेल्या सामूहिक प्रयत्नामुळेच हे यश मिळाले असून आता जिल्ह्यातील जनतेने गाफील न राहता सतर्क राहणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केले.
जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, जिल्ह्यात कोरोनाचे २६ रूग्ण होते. यातील २४ जण निगेटिव्ह आले आहेत. तर बालकाचे नमूने दुसर्यांदा तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या बालकाचा पहिले नमुने निगेटिव्ह आल्याने आता जिल्ह्यातील २५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. याबाबतचा सविस्तर अहवाल शनिवारी रात्रीपर्यंत येणे अपेक्षीत आहे. असे झाल्यास मिरज शासकीय रूग्णालयातील आयसोलेशन कक्षाता आता केवळ एका रूग्णावर उपचार सुरू राहणार असून लवकरच हा रूग्णही कोरोनामुक्त होईल.
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने दिलेल्या नियमांचे प्रशासनाने अत्यंत काटेकोरपणे पालन केल्यानेच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी झाली आहे. प्रशासनातील प्रत्येक घटकाने या कालावधीत अत्यंत जबाबदारीने काम केले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात राहू शकली व आहे ते रूग्णही बरे झाले आहेत.
कोरोना बाधितांची संख्या घटली म्हणून जिल्ह्यातील जनतेने आता अजिबात गाफिल राहू नये उलट अधिक सर्तकता बाळगली पाहिजे. प्रशासनाकडूनही योग्य ते नियंत्रण कायम असणार आहे. नियमीतपणे हात धुणे व सोशल डिस्टस्टटींग पाळणे अजूनही गरजेचे आहे.
सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत सर्वसामान्यांना याची झळ बसू नये यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंच्या चढ्या भावाने विक्री सुरू असल्याचे प्रकार लक्षात आल्याने त्यांच्यावर कारवाईचे आदेश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यात औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध असून याबाबतही जनतेने निश्चिंत रहावे असे आवाहनही जिल्हाधिकार्यांनी केले. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. संजय साळूंखे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे उपस्थित होते.