Corona in sangli :चारचाकी वाहनचालकही पोलिसांच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 08:15 PM2020-04-07T20:15:58+5:302020-04-07T20:33:19+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सांगली जिल्हा प्रशासनाने आता चारचाकी वाहनावर कारवाई सुरु केली आहे
सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून सुरू असलेल्या संचारबंदीच्या कालावधितही नियमांचा भंंग करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
बंदीआदेशाचे उल्लंघन करत विनाकारण रस्त्यावर फिरणाºया अडीच हजारांवर दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली. आता चारचाकी वाहनचालकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासन सतर्क असून, संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना राबवित प्रयत्न केले जात आहेत.
नागरिकांची होणारी गर्दी व त्याचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने लॉकडाऊन सुरू केले आहे, तर राज्यात संचारबंदीही लागू असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना बाहेर फिरण्यास मनाई केली आहे.
मंगळवारपासून तीन हजारांहून अधिक वाहनांवर जप्तीची कारवाई केली आहे, तर मोटार वाहन कायदा नियमातून सव्वालाखाहून अधिकचा दंडही वसूल झाला आहे. तरीही दिवसाला सरासरी ७०० हून अधिक वाहनांवर पोलिसांकडून कारवाई सुरूच आहे.
आता पोलिसांकडून कारवाईची माहिती मिळाल्याने रस्त्यावरील दुचाकीस्वारांची संख्या रोडावली आहे. असे असताना मोटारचालकही विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी त्यांच्यावरही कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार आतापर्यंत ३५ वाहनांवर कारवाई झाली आहे. त्यांच्याकडून दंडाचीही वसुली केली आहे
अत्यावश्यक सेवा व अत्यंत महत्त्वाच्या कामांसाठी पोलिसांकडून आॅनलाईन पध्दतीने ह्यई-पासह्ण दिला जात आहे. या पासचा वापर करून परवानगी घेतलेल्या मार्गावर प्रवास करता येतो. मात्र, दुचाकीप्रमाणेच चारचाकी वाहनांतूनही विनाकारण फिरणे होत असल्याचे दिसून आल्याने आता त्यांच्यावरही कडक कारवाई सुरू झाली आहे.