corona in sangli-ग्रामीण भागातील आजारी व परजिल्ह्यातून आलेल्या लोकांसाठी तपासणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 04:44 PM2020-04-09T16:44:44+5:302020-04-09T17:08:59+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. यापैकी कम्युनिटी स्क्रीनींग अर्थात समुदाय तपासणी ही महत्त्वाची मोहीम ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत राबवली जात आहे. या मोहिमेत दोन गटातील नागरिकांवर भर देण्यात येत आहे. यामध्ये ताप, खोकला, श्वसनाची अडचण असणारे नागरिक आणि मुंबई, पुणे किंवा परजिल्ह्यातून 1 मार्च नंतर सांगली जिल्ह्यात आलेले नागरिक यांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

corona in sangli - An investigation campaign for the sick and rural people in rural areas | corona in sangli-ग्रामीण भागातील आजारी व परजिल्ह्यातून आलेल्या लोकांसाठी तपासणी मोहीम

corona in sangli-ग्रामीण भागातील आजारी व परजिल्ह्यातून आलेल्या लोकांसाठी तपासणी मोहीम

Next
ठळक मुद्देग्रामीण भागातील आजारी व परजिल्ह्यातून आलेल्या लोकांसाठी तपासणी मोहीमतपासणी न झालेल्यांनी तालुका नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा : अभिजीत राऊत

सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात अनेक उपाययोजना राबविल्या जात आहेत. यापैकी कम्युनिटी स्क्रीनींग अर्थात समुदाय तपासणी ही महत्त्वाची मोहीम ग्रामीण भागात जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत राबवली जात आहे. या मोहिमेत दोन गटातील नागरिकांवर भर देण्यात येत आहे. यामध्ये ताप, खोकला, श्वसनाची अडचण असणारे नागरिक आणि मुंबई, पुणे किंवा परजिल्ह्यातून 1 मार्च नंतर सांगली जिल्ह्यात आलेले नागरिक यांचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत म्हणाले, या दोन्हीही गटातील लोकांची तपासणी ही आरोग्य यंत्रणेमार्फत सक्रियपणे सुरू आहे. मात्र जर या दोनपैकी कुठल्याही गटातील नागरिकांची तपासणी झाली नसेल तर त्यांनी आपल्या तालुका नियंत्रण कक्षासोबत संपर्क साधावा. सदर पद्धतीने संपर्क केल्यास वैद्यकीय अधिकारी घरी येऊन आपली तपासणी करतील. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची मोहीम आहे. यात सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

तालुकास्तरीय नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे.

जत 02344-248269, कवठेमहांकाळ 02341-223045, मिरज 0233-2227490, आटपाडी 02343-221717, विटा 02347-276056, कडेगाव 02347-295501, पलूस 02346-226220, तासगाव 02346-242328, शिराळा 02345-271108, इस्लामपूर 02342-224475.

 

Web Title: corona in sangli - An investigation campaign for the sick and rural people in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.