म्हैसाळ येथे विद्यालयातील शिक्षकास कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:24 AM2021-03-19T04:24:41+5:302021-03-19T04:24:41+5:30
फोटो ओळी :- म्हैसाळ (ता. मिरज) येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील व आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वॅब घेतले. ...
फोटो ओळी :- म्हैसाळ (ता. मिरज) येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील व आरोग्य विभागाचे कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वॅब घेतले.
म्हैसाळ : म्हैसाळ (ता. मिरज) येथील एका माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील एक शिक्षक कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आला आहे. आतापर्यंत ७४ विध्यार्थ्यांचे तर २५ शिक्षकांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. आणखी ६० विद्यार्थ्यांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे.
म्हैसाळ येथील एका महाविद्यालयातील एका शिक्षकाचा कोरोना पाॅझिटिव्ह अहवाल १७ मार्च रोजी आला. त्यानंतर लगेचच शाळा प्रशासनाने सल्लागार समितीची व शालेय शिक्षकाची बैठक घेऊन शाळा १४ दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शालेय शिक्षकांनी यांची माहिती म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद व शाळेच्या संस्थेला दिली. कोरोनाबाधित शिक्षकाच्या संपर्कात आलेल्या सुमारे ७४ विद्यार्थ्यांचे तर २५ शिक्षकांचे स्वॅब प्राथमिक आरोग्य केद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घेतले आहे. आणखी ६० विद्यार्थ्यांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे.
कोट
एका शिक्षकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर बुधवारी आम्ही विद्यार्थी व शिक्षकांचे असे एकूण ९८ जणाचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत. आणखी ६० जणाचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे. शिक्षकांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी.
- डॉ. विजय पाटील
वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र म्हैसाळ