सिनर्जी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरण केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:26 AM2021-03-27T04:26:32+5:302021-03-27T04:26:32+5:30
सांगली : सांगली-मिरज रोड येथील सिनर्जी मल्टिस्पेसिलीटी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते ...
सांगली : सांगली-मिरज रोड येथील सिनर्जी मल्टिस्पेसिलीटी हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते व मनपा उपायुक्त राहुल रोकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. रवींद्र आरळी, व्यवस्थापकीय संचालक प्रसाद जगताप उपस्थित होते.
लसीकरण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी ऑल इंडिया गोल्ड असोसिएशनचे उपाध्यक्ष गणपतराव पुदाले, सचिव शंकर पवार, संचालक राजेंद्र भोसले, भीमा ज्वेलर्सचे संचालक बाळकृष्ण चव्हाण, सांगली सराफ असोसिएशनचे अध्यक्ष रणजित जोग, भुरके ज्वेलर्सचे संचालक विजय भुरके यांच्यासह अनेक लाभार्थींनी लसीचा लाभ घेतला.
सिनर्जी हॉस्पिटलमध्ये वय वर्षे ४५ ते ५९, को-मोरबीडीटी असणारे तसेच वय वर्ष ६० वरील सर्व जेष्ठ नागरिक तसेच आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स यांना ही लस घेता येईल. ज्यांना लस घ्यायची असेल त्यांनी चंदनवाडी, सांगली-मिरज रोड, एसटी वर्कशॉपसमोर, मिरज येथे संपर्क साधावा असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाने केले आहे.