corona virus : मद्यविक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार 31 मार्च पर्यंत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 05:54 PM2020-03-20T17:54:24+5:302020-03-20T17:58:47+5:30

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मद्यविक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार 31 मार्च पर्यंत बंद  ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

corona virus: Alcohol licenses closed until March 31 | corona virus : मद्यविक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार 31 मार्च पर्यंत बंद

corona virus : मद्यविक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार 31 मार्च पर्यंत बंद

Next
ठळक मुद्देअनुज्ञप्तीधारकांना सिलबंद बाटलीतून मद्य विक्रीस परवानगी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आदेश

सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मद्यविक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार 31 मार्च पर्यंत बंद  ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 142 अन्वये सांगली जिल्ह्यातील पुढील मद्यविक्री आस्थापना (एफएल-3/फॉर्म ई/ई-2/एफएल-4/टिडी-1) अनुज्ञप्तीचे व्यवहार दि. 19 मार्च 2020 पासून दि. 31 मार्च 2020 अखेर पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.सीएल-03 अनुज्ञप्तीधारक यांनी ग्राहकांना अस्थापनेच्या मंजूर जागेत / परिसरात पिण्यास परवानगी न देता केवळ सिलबंद बाटलीतून मद्य विक्री करण्यास परवानगी दिली आहे.

या आदेशाश उल्लंघन झाल्यास अनुज्ञप्ती धारकाविरूध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.



 

Web Title: corona virus: Alcohol licenses closed until March 31

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.