corona virus -ग्रामीण क्षेत्रातील सर्व अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 11:31 AM2020-03-18T11:31:25+5:302020-03-18T11:32:49+5:30
सांगली जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील अगंणवाड्या दिनांक 16 ते 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी संबधित यंत्रणांना दिले आहे.
Next
ठळक मुद्देcorona virus -ग्रामीण क्षेत्रातील सर्व अंगणवाड्या 31 मार्च पर्यंत बंद राहणार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आदेश
सांगली : सांगली जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील अगंणवाड्या दिनांक 16 ते 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी संबधित यंत्रणांना दिले आहे.
राज्य शासनाने करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 लागू केला आहे. या अन्वये करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून त्यांनी हे निर्देश दिले आहेत.
तथापि, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अंगणवाडीमध्ये उपस्थित रहाणे बंधनकारक असल्याबाबत त्यांनी निर्देश दिले आहेत.