corona virus : सांगलीत नगरसेवकाच्या भावासह बँक कर्मचार्यांना कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 01:58 PM2020-07-28T13:58:16+5:302020-07-28T14:02:07+5:30
सांगली शहरातील खणभाग येथील एका नगरसेवकाच्या भावासह बँक कर्मचार्याला मंगळवारी कोरोनाची लागण झाली. सध्या महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन असला तरी रुग्णांच्या संख्येत मात्र दिवसेंदिवस वाढ होत आहे.
सांगली : शहरातील खणभाग येथील एका नगरसेवकाच्या भावासह बँक कर्मचार्याला मंगळवारी कोरोनाची लागण झाली. सध्या महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन असला तरी रुग्णांच्या संख्येत मात्र दिवसेंदिवस वाढ होत आहे.
खणभागामध्ये राहणार्या नगरसेवकाच्या भावाला त्रास होत होता. त्याचा स्वाब तपासणीसाठी घेतला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. संबंधित नगरसेवकासह कुटूंबाला होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्याच्या संपर्कातील लोकांचे स्वाब घेतले आहेत.
गणपती पेठ येथील एका बँक कर्मचार्यांचा अहवालही पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बँकेत खळबळ उडाली. बँकेचे कामकाज थांबविण्यात आले असून शाखा सील करण्यात येण्याची शक्यता आहे. लॉकडाऊनंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झालेली नाही. सोमवारी महापालिका क्षेत्रात तिघांचा मृत्यू झाला तर ९७ नवे रुग्ण आढळून आले होते.