corona virus : सांगली जिल्हा बँकेत तीन कर्मचाऱ्यांना कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 03:05 PM2020-07-28T15:05:55+5:302020-07-28T15:10:38+5:30

अन्य क्षेत्रांबरोबरच कोरोनाने बँकिंग क्षेत्रातही प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी एक रुग्ण सापडल्याने हादरलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत मंगळवारी आणखी दोन रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

corona virus: Corona to three employees in Sangli District Bank | corona virus : सांगली जिल्हा बँकेत तीन कर्मचाऱ्यांना कोरोना

corona virus : सांगली जिल्हा बँकेत तीन कर्मचाऱ्यांना कोरोना

Next
ठळक मुद्दे बॅँक कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची तपासणी होणार

सांगली : अन्य क्षेत्रांबरोबरच कोरोनाने बँकिंग क्षेत्रातही प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी एक रुग्ण सापडल्याने हादरलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत मंगळवारी आणखी दोन रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आयबीआयच्या आदेशानुसार लॉकडाऊनच्या काळातही सेवा देणाऱ्या सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेतील कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बॅँकेच्या मिरज रोडवरील प्रधान कार्यालयातील तीन कर्मचारी कोरोना बाधित आढळले आहेत. प्रधान कार्यालयासह शहरीभागातील सर्व शाखांमध्ये अजूनही कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भिती निर्माण झाली असून कर्मचाऱ्यांत प्रचंड नाराजी पसरली आहे.

शहरी भागात विशेषत: महपाालिका क्षेत्रात कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा वाढत आहे. जिल्हा बॅँकेच्या शाखा ग्रामीणसह शहरीभागातही आहेत. सांगलीतील प्रधान कार्यालयात १५० ते २०० कर्मचारी आहेत. येथेच बॅकेची मिरज रोड शाखाही कार्यरत आहे.

या शाखेत काम करणारा समडोळीचा एक कर्मचारी आठवडयापुर्वी कोरोना बाधीत झाला आहे. दोन दिवसापुर्वी बॅँकेच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावरील प्रत्येकी एक असे दोन कर्मचारीही कोरोना पॉझिटीव्ह आढळलले आहेत. तरीही बॅकेला याबाबतच गांर्भीय समजलेले नाही.

लॉक डाऊन मुळे जिल्हा बॅँकेचे पदाधिकारी, संचालक बॅकेकडे फिरकत नाहीत. त्यामुळे त्यांना कर्मचाऱ्यांचाा व्यथा माहित नाहीत. काही कर्मचाऱ्यांनी पदाधिकारी व संचालकांना फोनवरील याबाबत सांगीतले. मात्र त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे नाव पुढे करत हात झटकले.

Web Title: corona virus: Corona to three employees in Sangli District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.