corona virus : सांगलीच्या मध्यवर्ती कारागृहातील ६२ कैद्यांना कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 12:55 PM2020-08-03T12:55:08+5:302020-08-03T12:57:32+5:30
सांगली येथील मध्यवर्ती कारागृहातील तब्बल ६२ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी सकाळी स्पष्ट झाले. एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने कैद्यांना कोरोनाचे निदान झाल्याने कारागृह प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कैद्यांच्या उपचाराचे नियोजन करण्यात येणार आहे.
सांगली : येथील मध्यवर्ती कारागृहातील तब्बल ६२ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सोमवारी सकाळी स्पष्ट झाले. एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने कैद्यांना कोरोनाचे निदान झाल्याने कारागृह प्रशासन सतर्क झाले असून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने कैद्यांच्या उपचाराचे नियोजन करण्यात येणार आहे.
सांगली शहरातील मध्यवर्ती राजवाडा चौक परिसरात मध्यवर्ती कारागृह असून या कारागृहाची क्षमता २३५ आहे तर सध्या ३१९ कैदी या ठिकाणी आहेत. गेल्या चार महिन्यापासून कारागृह प्रशासनाने सोशल डिस्टंसिंगचे पालन करत या कैद्यांना कोरोनापासून सुरक्षित ठेवले होते. सध्या राज्य शासन व उच्च न्यायालयाचा ही आदेश असल्याने सर्व कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली यात ६२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
सध्या मध्यवर्ती कारागृह इमारतीसह शेजारच्या एका शाळेतहि कैद्यांची सोय करण्यात आली आहे. सोमवारी मोठ्या संख्येने कैद्यांना कोरोचे निदान झाल्याने आता त्यांच्या उपचाराचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. अशी माहिती मुख्य कारागृह अधिकारी सुशील कुंभार यांनी दिली.