corona virus : सांगली जिल्ह्यात ७६३ जणांना कोरोना; २७ जणांचा मृत्यू;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 03:13 PM2020-09-07T15:13:35+5:302020-09-07T15:15:31+5:30

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून रविवारी ७६३ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २७ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात ३३७ नवे रुग्ण आढळले असून रविवारी दिवसभरात ३६३ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्याची रुग्णसंख्या १७ हजारावर गेली आहे.

corona virus: Corona virus in 763 people in Sangli district; 27 killed; | corona virus : सांगली जिल्ह्यात ७६३ जणांना कोरोना; २७ जणांचा मृत्यू;

corona virus : सांगली जिल्ह्यात ७६३ जणांना कोरोना; २७ जणांचा मृत्यू;

Next
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात ७६३ जणांना कोरोना; २७ जणांचा मृत्यू;रुग्णसंख्या १७ हजारावर ; ३६३ जण झाले कोरोनामुक्त

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम असून रविवारी ७६३ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २७ जणांचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रात ३३७ नवे रुग्ण आढळले असून रविवारी दिवसभरात ३६३ जण कोरोनामुक्त झाले. जिल्ह्याची रुग्णसंख्या १७ हजारावर गेली आहे.

जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. यातील २७ जणांचा रविवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात सांगली येथील ५८ वर्षीय व्यक्ती, ५२ वर्षीय व्यक्ती, ५२ वर्षीय महिला, नागठाणे (ता. पलूस) येथील ६५ वर्षीय वृध्दा, अंकलखोप येथील ४५ वर्षीय व्यक्ती, आमणापूर येथील ३० वर्षीय महिला, ६९ वर्षीय वृध्द, वाटेगाव (ता. वाळवा) येथील ७० वर्षीय वृध्द, जुनेखेड येथील ६० वर्षीय महिला, आष्टा येथील ७० वर्षीय वृध्द, चिकुर्डे येथील ७२ वर्षीय वृध्दा, इस्लामपूर येथील ५० वर्षीय व्यक्ती, हिंगणगाव (ता. कवठेमहांकाळ) येथील ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला.

मिरज येथील ४७ वर्षीय महिला, ३६ वर्षीय तरुण, ६० वर्षीय व्यक्ती, बुधगाव येथील ४९ वर्षीय व्यक्ती, कुपवाड येथील ७५ वर्षीय वृध्दा, माधवनगर येथील ५३ वर्षीय व्यक्ती, कवठेपिरान येथील ५३ वर्षीय व्यक्ती, दुधगाव येथील ३३ वर्षीय तरुण, पायाप्पाचीवाडी येथील ७० वर्षीय वृध्द, कवलापूर येथील ५६ वर्षीय व्यक्ती, विटा येथील ८२ वर्षीय वृध्दा, ५५ वर्षीय व्यक्ती, मणेराजुरी (ता. तासगाव) येथील ६५ वर्षीय व्यक्ती, तसेच जत येथील ५८ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूने जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ६६० झाली आहे.

रविवारी महापालिका क्षेत्रात ३३७ रुग्ण आढळले आहेत. यात सांगलीतील १९३, तर मिरजेतील १४४ जणांचा समावेश आहे. वाळवा तालुक्यात ८३ नवे रुग्ण आढळले असून यात वाळवा, बोरगाव, कापूसखेड, बहे, कासेगाव, इस्लामपूर, आष्टा, फाळकेवाडी, रेठरेधरण, कामेरी, येडेनिपाणी, रोझावाडी, नेर्ले, धनगरवाडी, ऐतवडे खुर्द, येलूर, तुजारपूर, पेठ येथील रुग्णांचा समावेश आहे.

मिरज तालुक्यात ६२ रुग्ण नवे असून यात नांद्रे, म्हैसाळ, अंकली, कवलापूर, कानडवाडी, सोनी, गुंडेवाडी, चाबुकस्वारवाडी, टाकळी, मल्लेवाडी, वड्डी, कवठेपिरान, ढवळी, समडोळी, सावळवाडी, बामणोली, खंडेराजुरी, सलगरे, तुंग, मौजे डिग्रज, बेडग, इनामधामणी, पद्माळे, मालगाव, सुभाषनगर, कसबे डिग्रज, मानमोडी, एरंडोली, विजयनगर येथील बाधितांचा समावेश आहे.

Web Title: corona virus: Corona virus in 763 people in Sangli district; 27 killed;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.