corona virus : चार महिन्यात पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 03:24 PM2020-10-30T15:24:12+5:302020-10-30T15:26:21+5:30
गेल्या महिन्यापर्यंत वाढत असलेला कोरोनाचा कहर कमी होत असून, सध्या सर्वाधिक दिलासादायक चित्र समोर येत आहे. गुरुवारी ११३ नव्या रुग्णांची नोंद झाली, जी गेल्या चार महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे. तसेच मृत्यूची संख्याही कमी होत, तिघांच्या मृत्यूची नोंद झाली, तर १२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
सांगली : गेल्या महिन्यापर्यंत वाढत असलेला कोरोनाचा कहर कमी होत असून, सध्या सर्वाधिक दिलासादायक चित्र समोर येत आहे. गुरुवारी ११३ नव्या रुग्णांची नोंद झाली, जी गेल्या चार महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे. तसेच मृत्यूची संख्याही कमी होत, तिघांच्या मृत्यूची नोंद झाली, तर १२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोनाच्या संख्येत लक्षणीय घट होतानाच, बाधितांचे प्रमाणही घटत चालल्याने जिल्ह्याला दिलासा मिळत आहे. गेल्या महिन्यापासून सरासरी २५० ते ३०० वर असलेली रुग्णसंख्याही कमी होत असून गुरुवारी ११३ जण बाधित आढळले आहेत. बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाणही कायम असून, एकाच दिवसात सर्वात कमी रुग्णसंख्या, तसेच सर्वात कमी बळींची संख्या, असे दिलासादायक चित्र दिसून आले.
जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी तिघांचा मृत्यू झाला असून, यात तासगाव तालुक्यातील दोघांचा, तर शिराळा तालुक्यातील एकाचा समावेश आहे. महापालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या १६३१ वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाच्यावतीने नियमित चाचण्या घेण्यात येत असून आरटीपीसीआरअंतर्गत १०८६ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात ६१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या २०८९ चाचण्या घेण्यात आल्या, त्यातून ५७ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी २१२ जणांची प्रकृती चिंताजनक असून यातील १६५ जण ऑक्सिजनवर, ९ जण हाय फ्लो नेझल ऑक्सिजनवर, तर ३८ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील कोल्हापूर, मुंबई आणि विजापूर येथील पाचजणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
- आतापर्यंतचे एकूण बाधित ४४८६८
- उपचार घेत असलेले १८६८
- कोरोनामुक्त झालेले ४१३६९
- आतापर्यंतचे एकूण मृत्यू १६३१
- गुरुवारी दिवसभरात...
- सांगली ११
- मिरज ३
- वाळवा २५
- खानापूर १४
- तासगाव १३
- कवठेमहांकाळ, शिराळा प्रत्येकी ११
- कडेगाव ८
- आटपाडी ६
- मिरज ५
- जत ३