corona virus : रुग्णालये हाऊसफुल्ल, कोविड एक्स्प्रेस मात्र रिकामीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 06:06 PM2020-08-13T18:06:25+5:302020-08-13T18:07:14+5:30
कोरोना रुग्णांनी सांगली-मिरजेतील शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल होत आहेत. तेथे बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढताहेत. पण कोरोनाग्रस्तांसाठीची रेल्वेची कोविड एक्स्प्रेस मात्र वापराविनाच थांबून आहे. मिरज जंक्शनमध्ये बावीस कोचची कोविड एक्स्प्रेस मागणीच्या प्रतीक्षेत थांबून आहे.
सांगली : कोरोना रुग्णांनी सांगली-मिरजेतील शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल होत आहेत. तेथे बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढताहेत. पण कोरोनाग्रस्तांसाठीची रेल्वेची कोविड एक्स्प्रेस मात्र वापराविनाच थांबून आहे. मिरज जंक्शनमध्ये बावीस कोचची कोविड एक्स्प्रेस मागणीच्या प्रतीक्षेत थांबून आहे.
मार्चमध्ये कोरोना हात-पाय पसरू लागताच रेल्वेने आयसोलेशन वॉर्डसाठी पुढाकार घेतला. स्लीपर आणि वातानुकूलित बोगींचे रूपांतर विलगीकरण कक्षात केले. एकट्या पुणे विभागात ६० कोच तयार आहेत. त्यातील ५५० बेड पुणे, मिरज आदी स्थानकांत थांबून आहेत. त्यांचा वापर जिल्हा प्रशासनाने केलेला नाही. त्यांच्याकडून मागणी येताच ते दिले जातील, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.