corona virus : कोरोनाबाधितांच्या संख्येतील वाढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 10:55 AM2020-11-23T10:55:54+5:302020-11-23T10:58:31+5:30
corona virus, sanglinews तीन दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ शनिवारीही कायम होती. दिवसभरात ८० जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर ५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
सांगली : तीन दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ शनिवारीही कायम होती. दिवसभरात ८० जणांना कोरोनाचे निदान झाले आहे, तर ५३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.
दिवाळीनंतर बाधितांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यास दुजोरा मिळणारी आकडेवारी रोज समोर येत आहे. त्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांना रॅपिड ॲन्टिजेन चाचणी बंधनकारक करण्यात आल्याने चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. तरीही बाधितांच्या संख्येतील वाढ चिंताजनक ठरत आहे.
शनिवारी उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी तासगाव व जत तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या १६८८ वर पोहोचली आहे. महापालिका क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.
आरोग्य विभागाच्यावतीने शनिवारी आरटीपीसीआरअंतर्गत ६९८ जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यात २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ४१९५ चाचण्या घेण्यात आल्या. त्यात ५८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे. रॅपिडच्या चाचण्या दोन दिवसांपासून वाढविण्यात आल्या आहेत.
उपचार घेत असलेल्या ४०८ रुग्णांपैकी ७७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात ६४ जण ऑक्सिजनवर, तर १३ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. जिल्ह्यात उपचारासाठी आलेल्या सातारा जिल्ह्यातील एकास कोरोनाचे निदान झाले आहे.
- आतापर्यंतचे एकूण बाधित ४६४२२
- उपचार घेत असलेले ४०८
- कोरोनामुक्त झालेले ४४३२६
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १६८८
शनिवारी दिवसभरात
- सांगली ७
- मिरज १
- मिरज तालुका १३
- वाळवा १२
- तासगाव, जत प्रत्येकी १०
- आटपाडी ८
- खानापूर ७
- कवठेमहांकाळ ६
- पलूस ४
- कडेगाव २