corona virus -मास्क व हँन्ड सॅनिटायझरच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी अधिसूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 05:27 PM2020-03-23T17:27:33+5:302020-03-23T17:33:05+5:30
कोविड-19 विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणारे मास्क (२ प्लाई व ३ प्लाई), मास्क, मास्क (२ प्लाई व ३ प्लाई) च्या उत्पादनासाठी लागणारा मेल्ट ब्लोन नोन झ्रवोवन फैब्रिक कच्चा माल व हँन्ड सॅनिटायझर च्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र शासनाने अधिसूचना जारी केली आहे.
सांगली : कोविड-19 विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणारे मास्क (२ प्लाई व ३ प्लाई), मास्क, मास्क (२ प्लाई व ३ प्लाई) च्या उत्पादनासाठी लागणारा मेल्ट ब्लोन नोन झ्रवोवन फैब्रिक कच्चा माल व हँन्ड सॅनिटायझर च्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र शासनाने अधिसूचना जारी केली आहे.
या अधिसूचनेनुसार मास्क (२ प्लाई व ३ प्लाई) च्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल मेल्ट ब्लोन नोन झ्रवोवन फैब्रिक ची किरकोळ किंमत 13 मार्च 2020 च्या एक महिना अगोदर म्हणजे दिनांक 12 फेब्रुवारी 2020 रोजीच्या प्रचलित किंमतीपेक्षा अधिक राहणार नाही. मास्क (३ प्लाई सर्जिकल मास्क) ची किरकोळ किंमत दिनांक 13 मार्च 2020 च्या एक महिना अगोदर म्हणजे दि. 12 फेब्रुवारी 2020 रोजीची प्रचलित किंमत किंवा 10 रूपये प्रति मास्क यापैकी जी कमी असेल ती आणि मास्क (२ प्लाई) ची किरकोळ किंमत ८ रूपये प्रति मास्क पेक्षा अधिक राहणार नाही.
हँन्ड सॅनिटायझरची किंमत 200 मिलीलीटर च्या प्रत्येक बाटलीसाठी 100 रूपये पेक्षा अधिक राहणार नाही. या किंमतीच्या प्रमाणातच हँन्ड सॅनिटायझरच्या इतर प्रमाणासाठी किंमत निश्चित केली जाईल, अशी अधिसूचना जारी केली आहे. मास्क, सॅनिटायझरची विक्री विहीत दरानुसार होत नसल्यास सांगली जिल्हा नियंत्रण कक्ष क्रमांक 0233-2373032 या क्रमांकावर कळवावे.
नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित
कोराना व्हायरस (कोविड-19) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तातडीने करावयाच्या उपाययोजना व नियंत्रण करण्यासाठी राष्ट्रीय, राज्यस्तर व जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. हे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.
नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय सांगली झ्र 0233-2600500, टोल फ्री 1077, मो.क्र. 8208689681 / 9370333932, कोरोना नियंत्रण कक्ष (जिल्हा परिषद सांगली) झ्र 0233-2373032, राज्यस्तरीय कोराना नियंत्रण कक्ष झ्र 020-26127394, राष्ट्रीयस्तर नियंत्रण कक्ष झ्र 91-11-23978046.
परदेशातून, मुंबई, पुणे कडून आलेल्या प्रवाशांची माहिती देण्याचे आवाहन
परदेशातून किंवा मुंबई / पुणे कडून आलेल्या प्रवाशांची माहिती https://forms.gle/J1avKMTDGV34Ae7n9 या या लिंक वर भरावी. स्वत: प्रवासी किंवा इतर नागरिक सुध्दा ही माहिती भरू शकतात. कोरोना विरूध्द आपण सर्वांनी लढा द्यायचा आहे. त्यामध्ये आपले योगदान शक्य त्या प्रकारे द्या, असे आवाहन सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.