corona virus in sangli- संचारबंदी कालावधीत 1655 जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:03 PM2020-03-25T17:03:22+5:302020-03-25T17:04:42+5:30
जनता कफ्यूर्मध्ये दिनांक 22 मार्च रोजी रात्री 9 ते 24 मार्चच्या सायंकाळी 6 पर्यंत एकूण 1655 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
सांगली : कोरोना विषाणूचा प्रदुर्भाव टाळण्यासाठी वारंवार गर्दी टाळा, घराबाहेर पडू नका असे अवाहन करण्यात येत आहे. यासाठी आनेक तातडीच्या उपायायोजनाही काटेकोरपणे राबविण्यात येत आहेत. जनता कफ्यूर्मध्ये दिनांक 22 मार्च रोजी रात्री 9 ते 24 मार्चच्या सायंकाळी 6 पर्यंत एकूण 1655 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक 22 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कफ्यूर् चे आवाहन केले होते याला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. तथापि, काही लोक अनावश्यक घराबाहेर पडून स्वत:चे आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. याला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कडक भूमिका घेत आहे.
दिनांक 22 मार्च रोजी रात्री 9 ते 24 मार्चच्या सायंकाळी 6 पर्यंत एकूण 1655 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये भादविस कलम 188 अन्वये 24 जणांवर व मोटार वाहन केसेस 1631 कारवाई करण्यात आली असून एकूण 4 लाख 22 हजार इतका दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे.