corona virus in sangli - जिल्ह्यात सद्यस्थितीत परदेशवारी करुन आलेले 535 प्रवाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 04:56 PM2020-03-25T16:56:27+5:302020-03-25T16:58:27+5:30
सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आतापर्यंत 535 व्यक्ती आलेल्या आहेत. यापैकी 37 व्यक्ती आसोलेशन कक्षात दाखल असून या सर्व व्यक्तींचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 22 जणांचे स्वाब निगेटीव्ह असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
सांगली : सांगली जिल्ह्यात परदेशवारी करुन आतापर्यंत 535 व्यक्ती आलेल्या आहेत. यापैकी 37 व्यक्ती आसोलेशन कक्षात दाखल असून या सर्व व्यक्तींचे स्वॉब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी 22 जणांचे स्वाब निगेटीव्ह असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
4 जणांचे स्वॉब टेस्ट पॉझिटीव्ह आली असून 11 जणांची अद्यापही रिपोर्ट येणे बाकी आहे. उर्वरित 498 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून 40 व्यक्तींचा १४ दिवसाचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे.
सद्यस्थितीत 458 प्रवाशी होम क्वारंटाईनमध्ये आहेत. ज्या 4 रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यांच्या घरी 10 सदस्य असून 29 लोक नजिकच्या संपर्कातील आहेत. इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाचे 4 मेडिकल ऑफिसर व 11 कर्मचारी त्यांच्यावर देखरेख करित आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.