कडेगावात लायन्स क्लबकडून कोरोना योद्ध्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:02+5:302021-07-02T04:19:02+5:30
कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात ‘डॉक्टर्स डे’चे औचित्य साधून लायन्स क्लबच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा झाला. पुरस्काराचे वितरण लायन्स ...
कडेगाव येथील महात्मा गांधी विद्यालयात ‘डॉक्टर्स डे’चे औचित्य साधून लायन्स क्लबच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा झाला. पुरस्काराचे वितरण लायन्स क्लबचे प्रांतपाल मावजी पटेल व जगदीश पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी प्रांताधिकारी डॉ. गणेश मरकड, तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा चौगुले, चिंचणीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पौर्णिमा शृंगारपुरे, कडेगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष कालेकर या उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि कडेगाव येथील डॉ. दीपक शिंदे, कडेगावचे पोलीस निरीक्षक पांडुरंग भोपळे व चिंचणीचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांना कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चिंचणी येथील डॉ. सुधीर डुबल यांना ध्वन्वंतरी पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे कडेगाव तालुकाध्यक्ष डॉ. शंकर पवार, उपाध्यक्ष डॉ. अशपाक मुल्ला, सचिव कुलदीप महाजन उपस्थित होते.
फोटो ओळ : कडेगाव येथे चिंचणी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पौर्णिमा शृंगारपुरे यांना मावजी पटेल व जगदीश पुरोहित यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.